नवी दिल्ली – खास आपल्या ग्राहकांसाठी भारतातील प्रसिद्ध मोबाईल नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओने आपला नवा ४ जी डाटा प्लॅन लाँच केला असून हा प्लॅन ७९९ रुपयांचा आहे. युजर्सला या प्लॅनअंतर्गत दररोज ३ जीबी डाटासह अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
आता बोला… जिओ देणार दररोज ३जीबी डाटा
१९ रुपये, ३०९ रुपयांच्या प्लॅनसह इतर विविध प्लॅनस् रिलायन्स जिओकडून बंद करण्यात आले होते. या प्लॅनची मागणी त्यानंतर वाढली होती. हे सर्व प्लॅनस् युजर्सच्या प्रचंड मागणीनुसार पुन्हा सुरु केले जाणार आहेत. त्याचबरोबर कंपनीने आता ७९९ रुपयांत प्लॅन लाँच केला असून युजर्सला रिलायन्स जिओच्या या प्लॅननुसार दररोज ३ जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. ९० दिवसांची वैधता या प्लॅनची असणार आहे.