टोकियो मोटर शोमध्ये होंडाने सादर केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर


नवी दिल्ली : टोकियो मोटर शोमध्ये होंडाने आपली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली असून या नव्या स्कूटरचे नामकरण होंडाने पीसीएक्स इलेक्ट्रिक असे ठेवले आहे. १.३३ हॉर्सपावरची इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम आयर्न मोबाईल बॅटरी पॅक या स्कूटरमध्ये लावण्यात आली आहे. मोबाईल पावर पॅक असे या बॅटरी पॅकचे नाव आहे.

स्कूटरची लांबी १,९२३एमएम, रूंदी ७४५एमएम आणि उंची १,१०७एमएम आहे. पीसीएक्स हायब्रिडला सुद्धा जपानी टू व्हिलर कंपनी होंडाने या मोटार शोमध्ये सादर केले. १५० सीसीचे सिंगल सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन यात लावण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही स्कूटर्स ऑटो एक्सपो २०१८ मध्ये लॉन्च केल्या जाणार की नाही याची माहिती समोर आलेली नाही. होंडाची भारतातील ही पहिली प्रिमियम स्कूटर असून या स्कूटरची किंमत होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षाही जास्त असणार आहे. पुढील वर्षी या स्कूटर भारतात लॉन्च केल्या जाऊ शकतात. होंडा पीसीएक्स इलेक्ट्रिक स्कूटरची अंदाजे किंमत ८५ हजार रुपयांच्या जवळपास असू शकते.

Leave a Comment