येथे आत्मे घेताहेत वर्षानुवर्षे पेन्शन


जगात भूत प्रेत आत्मे आहेत का नाहीत हा आजही वादाचा विषय आहे. बॉलीवूड हॉलीवूड मध्ये भूत प्रेत आत्मे यावर अनेक चित्रपट निघतात व ते जोरदार चालतातही. कांही जणांच्या मते हा अंधविश्वास आहे. भारताच्या धट्ट्याकट्टया समजल्या जाणार्‍या पंजाब राज्यात खरी भुतांची टोळी अस्तित्वात आहे आणि पंजाब सरकार गेली अनेक वर्षे ६५७४३ भुतांना पेन्शनही देत आहे. पंजाब सरकारतर्फे ज्येष्ठ व्यक्ती, विधवा व दिव्यांगांना दरमहा ५०० रूपये पेन्शन दिली जाते व त्यासाठी दरमहा ५० कोटी रूपये खर्च केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये एकूण २.४५,९३५ पेन्शनर आहेत. त्यातील ४५१२८ हे बनावट पेन्शनर असावेत कारण त्यांचा पत्ताच चुकीचा आहे. एकूण पेन्शनरांपैकी ४२४३७ अगदी जवान आहेत व तरीही ते निवृत्ती पेन्शन घेत आहेत.१०१९९ पेन्शनर हे श्रीमंत आहेत तरीही पेन्शन घेत आहेत तर ६५७४३ पेन्शनरांचा मृत्यू झाला आहे मात्र गेली अनेक वर्षे ते पेन्शन घेत आहेत. ही पेन्शन त्यांचे आत्मे येऊन घेतात की काय असा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. या पेन्शनपोटी सरकारने आत्तापर्यंत १९ लाख ८० हजार रूपये खर्च केले आहेत. सरकारने नुकतेच पेन्शनधारकांचे रिव्हेरिफिकेशन केले तेव्हा ही माहिती उघडकीस आली आहे. आता मृतात्मांची ही पेन्शनची रक्कम गेली कुठे याचा तपास सुरू असल्याचे समजते.

Leave a Comment