पहिली डेंटप्रूफ कार फ्लेस्बी सादर


टोक्यो येथे सुरू असलेल्या मोटर शेा २०१७ मध्ये जगातील पहिली डेंट प्रूफ म्हणजे ज्या कारला धडक बसल्यावर किंवा ती स्वतःच धडकल्यावरही पोचे व चरे पडणार नाहीत अशी कार सादर करण्यात आली आहे. टोयोटोने तयार केलेली ही कार फ्लेस्बी नावाने सादर केली आहे मात्र ती प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी २०३० सालची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ही इलेक्ट्रीक कार आहे. या कारच्या चारी बाजूंना रबराच्या एअरबॅग्ज लावल्या गेल्या आहेत. वेगाने जात असताना समजा या कारला दुसर्‍या वाहनाची धडक बसली अथवा हीच कार वेगामुळे नियंत्रण न ठेवता आल्याने कुठे धडकली तर या एअरबॅग्ज त्वरीत उघडतात व यामुळे कारला तसेच आत बसलेल्यांना कोणताही अपाय होत नाही. इतकेच नव्हे तर दुसर्‍या वाहनाची धडक बसली असेल तर त्यालाही कांही नुकसान होणार नाही. या कार मध्ये एकच व्यतक्ती बसू शकते. भविष्यात एकापेक्षा अधिक प्रवाशांना जाता येईल या प्रकारे ही कार डिझाईन केली जाणार आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment