मजबूत स्मार्टफोन निर्मितीबद्दल प्रसिद्ध असलेल्या ए टी कंपनीने त्यांचा नवा अधिक दणकट स्मार्टफोन कॅट एस ४१ नावाने बाजारात आणला आहे. या फोनची बांधणी अतिशय उत्तम असून कोणत्याही परिस्थितीशी हा फोन मुकाबला करू शकणार आहे. विशेषतः ज्यांना ग्लव्हज घालून फोन घेण्याची वेळ येते अथवा ज्यांना ओल्या हाताने काम करताना फोन घेण्याची वेळ येते त्यांच्यासाठी हा फोन खूपच फायदेशीर आहे.
मजबूत एटी कॅट एस ४१ स्मार्टफोन सादर
या फोनला डिस्प्ले जवळ फिजिकल बटण दिले गेले आहे. ते नेव्हीगेशनकरता वापरता येते तेही व्हॉल्यूम थांबवून व पॉवर बटण शिवाय. याला प्रोग्रॅमेबल की दिली गेली असून टॉर्च, कॅमेरा व पुश टू टॉक साठी वापरता येते. या फोनला ५ इंची फुल एचडी स्क्रीन, गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ३जीबी रॅम,३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा असून त्यात सेल्फी घेताना व्हिडीओ चॅटींग करण्याची सुविधा आहे.
या फोनसाठी ५ हजार एमएएच ची बॅटरी आहे. विशेष म्हणजे या बॅटरीचा वापर अन्य डिव्हाईस चार्ज करण्यासाठीही करता येतो. या फोनची किंमत ४४९ डॉलर्स असून तो अमेझॉन व ईबे तसेच कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.