३७ व्या बाळाचे बाप होणार ६० वर्षाचे आजोबा


इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साठ वर्षांचे आजोबा ३७ व्या बाळाचे बाप होणार असून त्यांच नाव हाजी गुलजार खान वजीर असे आहे. यासंदर्भातील वृत्त दै. सामनाने दिले आहे. दरम्यान सर्वसाधारण जोडपी एक किंवा जास्तीत जास्त दोन मुले असा विचार करीत असतात. पण गुलजार यांना आधीच पाच-दहा नव्हे तर तब्बल ३६ आपत्ये आहेत.

आतापर्यंत त्यांनी तीन लग्न केली आहेत. त्यांना ही ३६ मुले तीनही पत्नींपासून आहेत. लवकरच त्यांची एक पत्नी बाळाला जन्म देणार आहे. सध्या पत्नी, मुले, सूना व नातवंडे असे १५० जणांचे मोठे कुटुंब हा चर्चेचा विषय बनला आहे. ही गोष्ट गुलजार खान यांच्यासाठी अभिमानाची आहे. एवढे मोठे आमचे कुटुंबच आहे कि आमच्या मुलांना खेळण्यासाठी बाहेरच्या कोणाचीही गरज नसल्याचे खान बंधू मोठ्या अभिमानाने सगळ्यांना सांगतात. खान यांनी ही अल्लाची मर्जी असल्याचे म्हणणे आहे. महत्वाची बाब म्हणजे खान यांचा भाऊ मस्तान यानेही तीन लग्न केली असून त्याला देखील २२ मुले आहेत.