आयफोन १० घेताय, मग त्याचा विमा नककी करा


अॅपलचा लेटेस्ट आयफोन टेनसाठी प्री बुकींग सुरू झाल्यानंतर कांही मिनिटांत सर्व स्टॉक संपल्याच्या बातम्याही झळकल्या आहेत. ज्यांना प्री बुकींग करता अ्राले त्यांना धन्य झाल्यासारखे वाटत असेलही मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार आयफोन टेन घेताना तो विम्यासह घेतला गेला पाहिजे अन्यथा ज्यांनी विना विमा बुकींग केले आहे, त्यांनी या फोनचा स्क्रीन तुटू नये म्हणून ईश्वराची करूणा भाकली पाहिजे.

यामागे असे कारण सांगितले जात आहे की आयफोनचा हा लेटेस्ट टेन फेस आयडी टेक्नॉलॉजीने युक्त आहे व पहिला बेजल लेस आयफोन आहे. भारतात हा फोन ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे व त्याची किंमत साधारण ९० हजार ते १ लाख रूपये आहे. मात्र या फोनच्या देखभाल व रिपेअरसाठी येणारा खर्चही प्रचंड आहे. म्हणजे समजा आयफोन टेन खरेदी केला व दुर्देवाने त्याचा स्क्रीन तुटला तर त्यासाठी युजरला पुन्हा ४१६०० रूपयांना बांबू बसणार आहे. म्हणजे स्क्रीन एकदा जरी तुटला तरी हा आयफोन युजरला ९० हजारांऐवजी १ लाख ३१ हजाराला पडणार आहे.

Leave a Comment