जर्मनी विषयीची मनोरंजक माहिती


जर्मनी म्हटले की आपल्या नजरेसमोर एकापेक्षा एक सरस कार्स उभ्या राहतात. इंजिनिअरिंगमध्येही जर्मनीने अभूतपूर्व क्रांती केलेली आहे तसेच जर्मनी म्हटले की जगाला युध्दाच्या खाईत लोटणारा हिटलर आठवतो, तशीच आठवते बर्लीनला विभागणारी व आता जमीनदोस्त झालेली भिंत. मात्र जर्मनी म्हणजे इतकेच नाही तर जर्मन लोक शौर्य आणि इमानदारपणाबद्दलही ओळखले जातात. या जर्मनीची आणखी वेगळी ओळख येथे करून देत आहोत.


जर्मनी हा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. अर्थात ही लोकसंख्या अ्राहे ८ कोटी. आता ही लोकसंख्या आपल्या भारताच्या आंध्रप्रदेशाइतकीच आहे ही बाब वेगळी. असे असले तरी जर्मनीची राजधानी बर्लिन हे शहर फ्रान्सच्या राजधानी पॅरिस पेक्षा ९ पट मोठे आहे.


जर्मनीत तुरूंगातून कैदी पळाला तर त्याला शिक्षा होत नाही. कारण प्रत्येक माणसाला स्वतंत्र व्हायचेच असते असा विचार येथे केला जातो. या उलट कुणी नाझी सॅल्यूट मारला तर तो मात्र अपराध समजला जातो. जर्मनीत बाळाचे नांव ठेवताना नावावरून मुलगा अथवा मुलगी हे कळले पाहिजे असेच ठेवावे लागते. नावावरून लिंगबोध होणार नाही असे नांव येथे ठेवता येत नाही. उहारणार्थ बॉबी.

जगातील पहिले मासिक १६६३ साली जर्मनीत छापले गेले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत पुरूषांची संख्या रोडावली व ती ३ महिलांमागे १ पुरूष अशी झाली होती. येथे आजही दररोज किमान १५ बाँब असे सापडतात, ज्यांना वापर महायुद्दात केला जाणार होता. असे बाँब शोधून डिफ्ूयज केले जातात.


जर्मनीची लोकसंख्या घटते आहे. १९८९ ते २००९ या काळात येथे २ हजार शाळा बंद कराव्या लागल्या कारण लहान मुलेच कमी होती. फँटा सर्वप्रथम जर्मनीसाठी बनविला गेला कारण पहिल्या महायुद्धाच्या काळात येथे कोकाकोलाची आयात अवघड बनली होती त्यामुळे याच कंपनीने फ्रूट ड्रिंक म्हणून फॅंटा बनविले व ते जर्मनीत पाठविले गेले. जर्मनीत महामार्गावर गाडीतील पेट्रोल संपले तर तो गुन्हा मानला जातो.

जर्मनीत नाझी सॅल्यूट मारणे अपराध मानला जातो. येथील १ टक्के नागरिक अनुवंशिक रित्या एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. जर्मनी लढवय्यांचा देश असला तरी या देशाचे संरक्षण बजेट जेवढे आहे, तेवढा खर्च अमेरिकेत पाळीव मांजरांसाठी केला जातो.

Leave a Comment