अरे देवा…! सेक्स तज्ञच सांगतात शाळांमध्ये दाखवा ‘तसले’ चित्रपट


एकीकडे जगभरातील शिक्षण तज्ञांमध्ये लैंगिक शिक्षण शाळांमध्ये दिले जावे का? यावरून वाद पेटलेला असतानाच दुसरीकडे थेट शाळांमध्ये पॉर्न चित्रपट दाखवण्याचा सल्ला डेनमार्कच्या एका सेक्स तज्ञाने देऊन टाकला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आलबोर्ग विश्वविद्यालयातील प्राध्यापक क्रिस्टियन ग्रॉगार्ड यांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे की, पॉर्न चित्रपट शाळांमध्ये दाखवल्याने लहान मुलांमध्ये कर्तव्यनिष्ठता आणि इमानदारी वाढण्यास मदत होऊ शकते आणि लहान मुले पॉर्न आणि वास्तविक जीवनातील लैंगिक संबंध यातील फरक ते समजू शकतात.

ग्रॉगार्ड पुढे म्हणतात की, माझा असा सल्ला आहे की, आठवी आणि नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत प्रशिक्षित शिक्षकांच्या मदतीने संवेदनात्मक पद्धतीने पॉर्न विषयावर गंभीर स्वरूपाची चर्चा केली जावी. विशेष म्हणजे १९७० पासूनच डेनमार्कमध्ये लैंगिक शिक्षण शाळांमधील अभ्यासक्रमातील अनिवार्य भाग आहे आणि काही शाळांमधील अभ्यासक्रमांमध्ये पॉर्नचा अभ्यास सुद्धा सामिल करण्यात आला आहे. पण डेनमार्कच्या सर्वच शाळांमध्ये अजून हे सुरू केले गेलेले नाही.

डेनमार्कचे सरकारी प्रसारक ‘डिआर’ यांना प्रोफेसर ग्रॉगार्ड यांनी सांगितले की, वर्गात पॉर्न चित्रपट दाखवणे लैंगिक शिक्षणापेक्षा अधिक चांगले आणि फायदेशीर आहे. कारण लैंगिक शिक्षणाअंतर्गत कन्डोम कसा वापरावा ह्या शिकवण्यात येणा-या गोष्टी आता जुन्या आणि पकाऊ झाल्या आहेत. प्रोफेसर ग्रॉगार्ड यांच्यानुसार, आम्हाला हे आता कळून चुकले आहे की, अधिकांश तरूणांना खूप लहान वयातच पॉर्न चित्रपटांचा परिचय झालेला असतो. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही त्यांना पहिल्यांदाच वर्गात पॉर्न चित्रपट दाखवणार नाही.

डेनमार्क हा जगातला पहिला देश आहे, ज्याने १९६७ मध्ये सर्वात पहिले पॉर्न चित्रपटांवरील बंदी हटवली आहे. पण भारतासारख्या देशात अजूनही लैंगिक शिक्षणाबाबत मतभेद आहेत. पण भारतासारख्या देशातही लैंगिक शिक्षणाची खूप गरज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आजही ग्रामीण भागात लैंगिक संबंधाबद्दल अनेक गैरसमज, अज्ञान दिसून येत असल्यामुळे अनेकांना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. लैंगिक शिक्षण सुरू करण्यामागचे अशी अनेक कारणे सांगता येतील. पण अजूनही भारतात यावर वाद सुरू असून हा मुद्दा बंद डब्यात पडला आहे.

Leave a Comment