अजंठा गुहा दत्तक घेणार यात्रा ऑनलाईन कंपनी


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील १४ वारसा पर्यटन स्थळांसाठी दत्तक योजना राबविली असून ही १४ स्मारके सांभाळण्यासाठी ७ कंपन्यांकडे सोपविली जात आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजंठा केव्हज ची जबाबदारी यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट कंपनीकडे दिली गेली असून हीच कंपनी दिल्लीच्या कुतुबमिनारचीही देखभाल करणार आहे.

या योजनेनुसार दत्तक घेतलेल्या कंपन्यांनी या स्मारकांची देखभाल करण्याबरोबरच त्यांच्यावर देखरेखही करायची आहे. दिल्लीच्या जंतरमंतरची जबाबदारी एसबीआय फौंडेशनकडे तर कोणार्क सूर्यंमंदिर, भुवनेश्वरचे राजाराणी मंदिर, जपयूर व ओडिसा तील रत्नमिटी स्मारके टी.के इंटरनॅशनलकडे सोपविली गेली आहेत. यात्रा ऑनलाईन कर्नाटकातील हंपी व जम्मू काश्मीरमधील लेह पॅलेस यांचीही देखभाल करणार आहे. कोच्चीच्या मत्तानचेरी पॅलेस संग्रहालय तसेच दिल्लीच्या सफदरजंग मकबरा ची जबाबदारी ट्रॅव्हल कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे आहे.

Leave a Comment