तीन हजार वर्षात एकदाच उमलते हे फूल


जगात अनेक प्रकारची वासाची, बिनवासाची, विविध रंगांची विविध आकारांची फुले आहेत. मात्र यातील एक फुल या सर्वांहून वेगळे आहे कारण असे मानले जाते की तीन हजार वर्षातून एकदाच हे फुल उमलते. उमलल्यावर या फुलाचा अलौकीक सुंगधच ते फुलल्याची ओळख देतो. अतिशय दुर्मिळ असे हे फुल स्वर्गीय फुल म्हणून ओळखले जात असले तरी त्याचे संस्कृत नांव आहे औदुंबर किंवा उंबर. या झाडाला फुले येतच नाहीत असा समज असला तरी तो खरा नाही. या झाडाची फुले अतिशय सूक्ष्म असतात त्यामुळे झाडाला फुले येत नाहीत असे मानले जाते. आपल्याकडे उंबराला फुल येणे अ्रसा वाकप्रचार आहे याचा अर्थ अतिदुर्मिळ घटना घडणे असा आहे.


या प्रकारचे वृक्ष जगात अनेक ठिकाणी आहेत.२००७ मध्ये चीनमधली डॉ.डोंग यांनी त्यांच्या परसातील झाडाला ३८ फुलांचा गुच्छ आल्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी हे फुल प्रथम दिसले होते असेही सांगितले जाते. तर १९९७ सालात दक्षिण कोरियातील बुद्धाच्या मूर्तीवर ही फुले आढळली होती. बौद्ध ग्रंथात या फुलाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. हे फुल पाहण्यासाठी मॅग्नीफाईंग ग्लास किंवा मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो.

असाही समज आहे की हे फुल नसून ती एक प्रकारची किड्यंाची अंडी आहेत. हा किडा झाडाच्या सालावर अंडी घालतो व त्यातून फुलांसारखी सुगंधी वाढ होते. हे फुल पवित्र जागीच येते असे बौद्ध ग्रंथात वर्णन अ्राहे.

Leave a Comment