पोर्शेचे वेगवान सुपर यॉट


अतिवेगवान व लग्झरी कार्ससाठी प्रसिद्ध असलेल्या पोर्शेने आपली जगासमोर वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळविल्यानंतर आता सुपर यॉटची निर्मिती केली आहे. ३५ मीटर लांबीच्या या आलिशान यॉटसाठी १२ दशलक्ष म्हणजे १०२ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. वार्षिक यॉट शेामध्ये भाग घेण्यासाठी हे यॉट मोनाको येथे पोहोचले आहे. जीटीटी ११५ असे या यॉटचे नामकरण केले गेले असून अशी फक्त ७ यॉट कंपनी तयार करणार आहे. याट कलेक्टरसाठी ही स्पेशल एडिशन यॉट तयार केली गेली आहेत.

या यॉटमध्ये स्पा, पूल, डायनिंग, बार तसेच आलिशान गेस्ट रूम आहे.इटालियन इंटिरीयर डिझाईन कंपनी मिनोटी ने कार्बन फायबरपासून हे यॉट तयार केले असून त्यात सहारातील दुर्मिळ संगमरवराचा वापरही केला गेला आहे. जुने पार्शियन लेदर व पोर्शेच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीने हे यॉट सुसज्ज बनविले गेले आहे. याचा टॉप स्पीड आहे २१ नॉटिकल मैल तसेच त्याला १६५० हॉसपॉवरचे हायब्रिड इंजिन दिले गेले आहे. हे यॉट ३४०० नॉटिकल मैलांचा प्रवास एकाच खेपेत करू शकते.

Leave a Comment