सरकारी बाबू घेताहेत बिटकॉईन मध्ये लाच


भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी मोदी सरकारने नोटबंदी लागू केली व त्याचा परिणाम सरकारी कर्मचार्‍यांना लाच घेताना अडचणी निर्माण होण्यात थोडाफार झाला असला तरी कांही लाचखोरांनी त्यावरही उपाय शोधला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुण्यातून या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी दलाकडे केल्या गेलेल्या तक्रारींनुसार हे लाचखोर आता बिटकॉईनच्या स्वरूपात लाच घेत आहेत.यापूर्वी मनी लाँड्रींगसाठीही बिटकॉर्सनचा वापर करण्याच्या कांही घटना उघडकीस आलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील अनेक संशयास्पद व्यवहारात एसीबी( अँटी करप्शन ब्युरो) कडे अनेक तक्रारी आल्या असून त्यात बिटकॉईनचा उल्लेख आहे. बिटकॉईन हे आभासी चलन जगातील सर्वात मौल्यवान चलन मानले जाते व जगातील कोणत्याही चलनात, उत्पादनाच्या स्वरूपात अथवा सुविधांबदली बिटकॉईनमध्ये व्यवहार करता येतात. ही डिजिटल करन्सी आहे व या माध्यमातून होणार्‍या व्यवहारात केंद्रीय अर्थ संस्था अथवा बँका कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत. हे सर्व व्यवहार वैयक्तीक पातळीवरच होतात. बिटकॉईन वॉलेटचा बँक खाते रूपात वापर करता येतो. यामुळे पैसा देणे, घेणे अथवा वापरण्यास मदत मिळते.

Leave a Comment