स्मार्टफोन बाजारात भारत दुसऱ्या क्रमांकावर


नवी दिल्ली – अमेरिकेला मागे टाकत भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ बनला आहे. चीन सध्या या बाजारपेठेत अव्वल स्थानी आहे. भारतातील मोबाईल बाजार स्वस्त हँडसेट आणि ४ जीमुळे वेगाने वाढत आहे. २०१७च्या दुस-या तिमाहीत थोड्याशा पडझडीनंतर, भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा तेजी आली आणि तिसऱ्या तिमाहीत शिपमेंटमध्ये २३ टक्क्यांची वाढ झाली. कॅनालिस विश्लेषकांच्या अहवालाप्रमाणे, या कालावधीत ४ कोटी हँडसेट विकले गेले आहेत.

केनलिस रिसर्चचे विश्लेषक ईशान दत्त म्हणाले की या निकालांमुळे भारतीय बाजारपेठेच्या क्षमतेबद्दल असलेल्या शंका पूर्णपणे स्पष्ट झाल्या आहेत. सध्या भारतात सुमारे १०० मोबाइल ब्रॅण्ड व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात कोणतीही अडचण भारतात नाही, तर वाढ वाढतच जाईल. स्वस्त स्मार्टफोन आणि एलटीई तंत्रज्ञानामुळे विक्रीत वाढ होत आहे.

सध्या बाजारात एकत्रीकरण सुरु असून भारतातल्या ७५ टक्के बाजारपेठेवर ५ टॉप कंपन्यांचा कब्जा आहे. यामध्ये सॅमसंग, शाओमी, व्हीवो, ओप्पो आणि लेनोवो यांचा समावेश आहे. सर्व कंपन्यांनी २०१७च्या तिसऱ्या तिमाहीत मजबूत वाढ नोंदवली आहे. तथापि, संपूर्ण बाजाराच्या ५०% सॅमसंग आणि शाओमी यांचा कब्जा आहे. प्रथम क्रमांकावर सॅमसंग तर दुस-या स्थानावर शाओमी आहे, ज्याची निर्यात २९० टक्क्यांनी वाढली आहे.