भारतीय लोकांसाठी मालमत्ता खरेदीसाठी दुबई हे पहिले पर्याय ठरले आहे. गेल्या दीड वर्षामध्ये भारतीयांनी सुमारे २२ हजार कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. दुबईच्या लँड डिपार्टमेंटने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, दुबईत गुंतवणूक करणारे भारतीय परदेशी जास्त आहेत.
दुबईमध्ये दीड वर्षात भारतीयांनी खरेदी केली ४२ हजार कोटींची मालमत्ता
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २०१४ पर्यंत यात १२ हजार कोटींची वाढ झाली आहे. भारतीय दरवर्षी दुबईत ३० हजार कोटी रुपये प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवतात. दुबईतील एकूण विक्री सुमारे एक लाख कोटी रुपये आहे. दुबई प्रॉपर्टी शोने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, जानेवारी २०१६ ते जून २०१७ दरम्यान भारतीय लोकांनी ४२ हजार कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे.
33 टक्के भारतीयांनी अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. व्हीलामध्ये १७ टक्के, व्यापारी मालमत्तेसाठी ९ टक्के, जमिनीत ६ टक्के आणि ३५ टक्के इतर जागी गुंतवणूक केली आहे. ज्या भारतीयांनी येथे गुंतवणूक केली ते मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि नवी मुंबई येथील आहेत. ८८% लोकांनी ३.२४ ते ६.५ कोटी गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी ८ टक्के लोकांनी ६५ लाख आणि ३.२४ कोटींच्या मालमत्तेची खरेदी केली आहे. बाकीच्यांनी ६.५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची खरेदी केली आहे.