बर्थ डे गिफ्ट- १०० कोटींचे सोन्याचे सँडल्स


सोन्याची क्रेझ जगभरातील सर्वच लोकांना आहे. सोन्याचे दागिने ही नेहमीची बाब झाली. अति श्रीमंत सोन्याचे आयफोन, सोन्याच्या कार्स, सोन्याच्या पर्स अशा वस्तूही वापरतात. मात्र सोन्याचे सँडल म्हणजे पायताणे वापरली जात असल्याची माहिती प्रथमच मिळते आहे. विशेष म्हणजे हे सँडल्स १०० कोटी रूपये किंमतीचे आहेत व वाढदिवसाची भेट म्हणून ते खास तयार करून घेतले गेले आहेत.

ही भेट कोण कुणाला देणार याचा खुलासा झालेला नाही. ब्रिटनमधील डिझायनर डेबी विल्घम हिने जगातील हे सर्वात महागडे जोडे तयार केले आहेत. यापूर्वी जगातील सर्वात महागडा ड्रेस तयार करण्याचे कामही डेबीने केले आहे. तिने तयार केलेल्या या खास सँडल्समध्ये दुर्मिळ गुलाबी व निळे हिरे वापरले गेले असून त्यांची किंमत साडेआठ लाख रूपये आहे. या शिवाय यात ३ कॅरटचे पांढरे हिरेही वापरले गेले आहेत.

सँडल्ससाठी सोन्याच्या चेन आहेत तर हे सँडल सोन्याच्या तारेने शिवले गेले आहेत. सँडलमधील चामड्याच्या भागावरही २४ कॅरेट सोन्याचा पेंट दिला केला आहे व त्यावर अरेबियन जस्मीन फुले वापरली गेली आहेत. ऑर्डरनुसार हे सँडल तयार केले गेल्याचे ती सांगते.
——-

Leave a Comment