तुम्हाला माहीत आहे का बफेट यांच्या सेकंदाची किंमत ?


वॉशिंग्टन – सार्वकालिक उच्चांकावर अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची संपत्ती पोहोचली असून त्यांची संपत्ती आता ५.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इन्डेक्समध्ये म्हणण्यात आले आहे. धनाढय़ांच्या यादीत बर्कशायर हाथवेचे प्रमुख असणारे बफेट हे तिस-या स्थानी असून पहिल्या स्थानी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यानंतर ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचा क्रम लागतो.

१.२५ कोटी भारतीयांच्या दरडोई उत्पन्नाएवढी ओहामा या राज्यात राहणारे बफेट यांची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. ती पाच वर्षात २.२८ लाख कोटी रुपयांनी वाढली. ती प्रतिवर्षी ४५,४८६ कोटी रुपयांनी वाढत आहे. प्रतिमहिन्याला ८७ वर्षीय बफेट ८.६८ लाख रुपये आणि सेकंदाला १४,४६७ रुपये कमवितात.

Leave a Comment