घरबसल्या करा सिम कार्ड ‘आधार’शी लिंक


नवी दिल्ली – जर आधार नंबरशी आपले सिम कार्ड जोडले गेले नसेल तर चिंता करू नका. तुम्ही आता घरबसल्या सिम कार्ड आधारशी लिंक करू शकता. यासंदर्भातील निर्देश दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांना जारी केले आहेत. त्यामुळे सिम व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सोपी ठरणार आहे.

याविषयीची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली असून ही प्रक्रिया सुरळीत करण्याकरता सरकारने प्रयत्न केले असल्यामुळे फोन क्रमांक किंवा सिम आता थेट घरबसल्या आधारशी लिंक करता येणार आहे. याकरिता वन टाईम पासवर्ड (ओटीपी), अॅप किंवा आयव्हीआरएसव्दारे लिंक करता येईल.

दरम्यान यापूर्वी आधारशी मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावे लागत असे. आता हे सर्व मोबाईल कंपन्यांच्या दुकानात जाऊन करू शकता किंवा घरबसल्या करणे देखील शक्य होईल. आजारी आणि वयोवृद्ध लोकांसाठी ही सुविधा थेट घरी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

Leave a Comment