तीन देशांना जोडणारे समुद्रशहर सौदी वसविणार


तेल विक्रीतून अमाप पैसा कमावून श्रीमंत देशांच्या यादीत पुढे असलेल्या सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेडसी कोस्टवर नवीन शहर वसविले जात असल्याची घोषणा केली असून त्यासाठी ३२ लाख कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. नया मुस्तकबिल म्हणजे नवे भविष्य या नावाने हे शहर वसविले जात असून जगातला या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. हे शहर पूर्णपणे समुद्रावर असेल तसेच ते स्पेशल झोन म्हणून वसविले जाईल. या शहरामुळे सौदी, जॉर्डन व इजिप्त अश्या तीन देशांच्या सीमा जोडल्या जातील. २६५०० किमीचा परिसरात हे शहर उभारले जाणार आहे.

यामध्ये रेडसीवर इजिप्त व जॉर्डनला जोडणारा पूल बांधला जाईल व या पुलाजवळ हे शहर वसविले जाईल. फ्रीझोन कन्सेप्टवर आधारित या शहराचे स्वतःचे कायदे व नियम असतील. जपानची सॉफ्टबँक कंपनी तसेच व्हिजन फंड यात गुंतवणूक करणार आहेत. या शहराला स्वच्छ पाणी, हरित उर्जा साठी विशेष व्यवस्था केली जाईल व अन्नधान्यासाठी सेंद्रीय शेती केली जाईल.२०२५ मध्ये या शहराचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.

Leave a Comment