टेस्लाने चीनकडे वळविला मोहरा


मोदी सरकारच्या मेक इन इंडियाला टेस्लाने मोठा झटका दिला असून त्यांचे उत्पादन केंद्र चीनच्या शांघायमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार इलेक्टिक कार उत्पादक कंपनी टेस्ला चीनमध्ये त्यांच्या संपूर्ण मालकिचा पहिला उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असून असा संपूर्ण मालकीचा प्रकल्प उभारणारी ती पहिलीच कंपनी आहे. वास्तविक भारताबरोबर टेस्लाची पहिला ओव्हरसीज प्रकल्प उभराणीची बोलणी सुरू होती मात्र भारतातील नियमांत सवलत मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्याने टेस्लाने चीनकडे आपला मोहरा वळविला आहे.

पंतप्रधान मोदी २०१५ साली अमेरिका दौर्‍यावर गेले असताना त्यांनी टेस्लाच्या उत्पादन केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी भारत मोठ्या संधी असलेला देश असल्याचे मत व्यक्त केले होते. भारतात २०३० पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रीक करण्याची योजना आहे त्याला अनुसरून मस्क यांनी हे मत व्यक्त केले होते तसेच भारतात मोठे उत्पादन केंद्र उभाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मेक इन इंडियाच्या नियमांनुसार ३० टक्के सुटे भाग भारतातूनच खरेदी करण्याच्या अटीवर तडजोड होऊ शकली नाही. अर्थात चीनमध्येही असे नियम आहेत. त्यांच्या नियमानुसार स्थानिक कंपनीशी भागीदारी करावी लागते. मात्र टेस्ला त्यांचा प्रकल्प फ्री ट्रेड क्षेत्रात शांघाय येथे उभारणार आहे. यामुळे त्यांच्या आयातशुल्कात २५ टकके बचत होणार आहे. परिणामी त्यांना कारच्या किंमती कमी करणे शक्य होणार आहे असे समजते.

Leave a Comment