अंतराळवीर मांजरीची मूर्ती स्थापन


चंद्रावर उतरलेले पहिले मानव म्हणून नील आर्मस्ट्राँग व एडविन एंड्रीन यांची नांवे आपल्याला माहिती आहेत. त्याचबरोबर या मानवांच्या अगोदरही प्रयोग म्हणून कांही प्राणी अंतराळात पाठविले गेले होते. त्यात रशियाने लायका नावाची कुत्री चंद्र्रावर पाठविली होती तर एनोस नावाचा एक चिपांझीही अंतराळात पाठविला गेला होता. मात्र याच अंतराळ मोहिमात एक मांजरीही अंतराळात पाठविली गेली होती याची माहिती फारश्या लोकांना नाही.

अर्थात ही मांजरी फ्रान्सतर्फे मानव कल्याणासाठी अंतराळात पाठविली गेली होती व या मांजरीचा जगाला विसर पडला याची खंत फ्रान्सवासियांना वाटते आहे. या मांजरीने दिलेल्या योगदानाची योग्य प्रसिद्धी व सन्मान तिला मिळाला पाहिजे या भूमिकेतून या मांजरीची मूर्ती पॅरिसमध्ये स्थापन करण्यात आली आहे. फेलीसिट नावाची ही मांजरी ५४ वर्षांपूर्वी आक्टोबर १९६३ साली अंतराळात पाठविली गेली होती. अर्थात डझनभर मांजरांमधून तिची निवड केली गेली होती.

Leave a Comment