लखनौत सर्वाधिक मनचले


प्रत्यक्ष रस्त्यांवर अथवा फोन व इंटरनेट कॉल करून तरूण मुली महिलांना सतावणारे मनचले उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात लखनौमध्ये असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. या रोमियोंवर नियंत्रण आणण्यासाठी १०९० हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून १५ नोव्हेंबर २०१२ रोजी सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आत्तापर्यंत १० लाख मुली महिलांचे फोन आले आहेत.

या संदर्भात माहिती देताना १०९० च्या सीअ्रो बबितासिंह म्हणाल्या, सर्वाधिक फोन २० ते २५ या वयोगटातील महिला मुलींकडून आले आहेत. त्यात राजधानी लखनौ सर्वात पुढे आहे. लखनौमधून १ लाख ५३ हजार कॉल आले आहेत तर त्या खालोखाल कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि गोरखपूर या शहरांचा नंबर आहे. २० ते २५ वयोगटातील अडीच लाखांहून अधिक मुली महिलांनी या हेल्पलाईनशी संपर्क साधला आहे. लखनौतील प्रत्येक ७ मुलींमागे एकीने हेल्पलाईनशी संपर्क साधला आहे.

या मनचल्यांवर नियंत्रण आणणे हे मोठे आव्हान आहे तरीही आलेल्या कॉलवरून छाननी करून १०० मोस्ट र्वांटेड मनचल्यांची यादी केली गेली आहे. यात समज देऊनही महिलांना सतावणार्‍यांचा समावेश आहे. यातील कांही जणांनी तर वारंवार समज देऊनही किमान १० मुलींना असा त्रास दिला आहे. या मनचल्यांना पकडणे अवघड होते आहे कारण त्यातील ७५ जणांची फेक आयडीवर सिम घेतली आहेत तर उरलेले २५ नेट कॉलिग करून असा त्रास देतात. नेट कॉलींगवरून ओळख पटविणे आणखी जिकीरीचे असते असे बबितासिंह यांचे म्हणणे आहे.