मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्ही व्हाल थक्क


नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश यांची गणना देशातीलच नाही तर जगभरातील सर्वात श्रीमंत लोकात केली जाते. त्यांचे घराची देखील गणना जगभरातील आलिशान घरात केली जाते. मुकेश अंबानींकडे स्वतःचे हॅलिकॉप्टर आहेच पण त्यांच्याकडे ५०० पेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत.

पण आता मुकेश अंबानी आपल्या संपत्तीमुळे नाही तर आपल्या ड्रायव्हरमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियात सध्या व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. ज्यात मुकेश अंबानी आपल्या ड्रायव्हरची निवड कशाप्रकारे करतात आणि त्यांना किती पगार देतात.

आपण आजवर मुकेश अंबानींच्या बद्दल खूप काही जाणून घेतले आहे. पण ते आपल्या ड्रायव्हरला किती पगार देतात ते माहीत आहे का? व्हायरल झालेल्या व्हिडीओत मुकेश अंबानींच्या घरात काम करने एवढे सोप्पे नाही असे सांगण्यात आले आहे. आणि त्यात गोष्ट तर त्यांच्या ड्रायव्हरची आहे म्हणजे त्यासाठी किती मेहनत करावी लागेल याचा अंदाज लावू शकता.

अंबानींचा ड्रायव्हर बनण्यासाठी कठीण परीक्षेतून जावे लागते. त्याचबरोबर अंबानींच्या ड्रायव्हरसाठी विविध कंपन्यांना ठेका दिला जातो. या कंपन्या त्या ड्रायव्हरचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे की याची खातरजमा करतात त्यानंतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे की याची खात्री केली जाते.

मुकेश अंबानी आपल्या ड्रायव्हरला गलेलठ्ठ पगार देतात. तुमच्या माहितीसाठी अंबानी एका ड्रायव्हरला २ लाखाहून अधिक पगार देतात अशी माहिती सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.