या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुत्रा सदिच्छा दूत


पंचतारांकीत हॉटेलमध्ये नोकरी मिळवायची असेल तर अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात तसेच त्यासाठी खास प्रशिक्षणही घ्यावे लागते. केवळ योग्य प्रशिक्षण असूनही भागत नाही तर उमेदवाराचे व्यक्तीमत्त्वही त्यासाठी महत्त्वाचे ठरते. ऑस्ट्रलियातील पार्क हयात मेलबर्न या पंचतारांकित हॉटेलमध्ये ३१ जुलै २०१७ पासून मिस्टर वॉकर या नावाच्या एका प्रेमळ, अतिशय गोड स्वभावाच्या कुत्र्याची केनियन अँबेसिडर म्हणून नेमणूक केली गेली असून त्यामुळे या हॉटेलमधील उतारूंना घरात राहात असल्याचा फिल येत आहे.

लाब्राडोर जातीचा हा कुत्रा १८ महिैन्यांचा आहे. तो हॉटेलमध्ये येणार्‍या प्रवाशांचे स्वागत करतोच पण त्यांना सर्वतोपरी मदतही करतो. म्हणजे त्यांचे सामान असलेली ट्राॅली ढकलतो, प्रवाशांना रूम शोधण्यास मदत करतो तसेच गाईड म्हणूनही काम करतो. प्रतिष्ठित पदावर नेमणूक झालेले मिस्टर वॉकर बैठकांनाही उपस्थित असतात तसेच लंच ब्रेकमध्ये तो पूल साईडला योगाही करतो. अतिशय प्रेमळ व माणसासारखी कौशल्ये अंगी असलेला वॉकर जॅकेट घालून कामावर हजर असतो.

येथे येणार्‍या प्रवाशांना वॉकरबरोबर वॉक घेणे, योगा करणे, बागेत खेळणे अशा सुविधा मिळतात. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी आधीपासून बुकींग करतात. वॉकर त्याच्यासाठी खास बनविलेल्या बेडवर बसून सगळीकडे बारीक नजर ठेवून असतो.

Leave a Comment