रेल्वे पादचारी पूल दुरूस्तीसाठी सचिनची २ कोटींची मदत


मुंबईतील एलफिस्टन रोड फुट ओव्हरब्रिजवर नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत २३ लोक मृत्युमुखी पडल्याची घटनेची दखल घेऊन भारताचा मास्टरब्लास्टर फलंदाज व राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकर याने त्याच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून दोन कोटी रूपयांची मदत दिली आहे. तसे पत्र त्याने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना लिहिले असून त्यात सचिन म्हणतो, मुंबईत नुकत्याच घडलेल्या रेल्वे पूल अपघात प्रकरणात निर्दोष लोकांना प्राणास मुकावे लागले असून त्याचे दुःख आहे. मुंबईत पश्चिम व मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांची दुरूस्ती करण्यासाठी प्रत्येकी १ -१ कोटीचा निधी देत आहे.

या निधीतून मुंबईकरांसाठी देण्यात येत असलेल्या सेवांत सुधारणा व्हावी असे मत व्यक्त करताना सचिनने देशात कुठेच या प्रकारचे अपघात पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे असे म्हटले आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून जे करता येईल ते करणार असल्याचे सचिनमे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment