चंद्रावरील भूमिगत भुयारांमध्ये होऊ शकते मानवी वसाहत, जपानी शास्त्रज्ञांचा दावा


चंद्रावर मानवी जीवनाच्या शक्यतेवर दीर्घकाळापासून विचार चालू आहे. अपोलो यान चंद्रावर उतरल्यानंतर ही चर्चा आणखी वाढली. मात्र चंद्रावरील भूमिगत भुयारे मानवी वसाहतीसाठी योग्य असल्याचे शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच आढळले आहे.

अत्यंत प्राचीन ज्वालामुखीपासून बनलेली ही भुयारे चंद्रावरील पृष्ठभागापासून मैलोगणती आतपर्यंत गेली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चंद्रावर येणाऱ्या वादळांपासून संरक्षण करणारी घरे त्यावर बनविता येऊ शकेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हवाई बेटांवरील काउमाना लावा भुयारांसारखी त्यांची रचना आहे. नासातील शास्त्रज्ञ रोनाल्ड ग्रीली यांनी 1971 साली हे भुयार असल्याची संकल्पना मांडली होती. मात्र त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.

जपानी संशोधनाच्या एका चमून हे भुयार अस्तित्वात असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हे संशोधन 2007 साली केले असले, तरी नुकतेच एका नियतकालिकात ते प्रकाशित झाले आहे. अपोलो यानानंतरचे सर्वात मोठे चंद्र अभियान असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. आता आमचे संशोधन भुयाराच्या आतील स्थिती जाणण्यावर आणि समजण्यावर केंद्रित आहे, असे हा शोध प्रबंध प्रकाशित करणारे शास्त्रज्ञ जूनिची हारुयामा यांनी सांगितले. या मोहिमेत चंद्रावरूल चर्चित मारियूस पहाडाजवळील खड्ड्याचे विश्लेषण जपान आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केले होते.

Leave a Comment