व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमुळे ग्रुप अॅडमिनला मिळणार ‘हे’ अधिकार


मुंबई : व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखीन नवे फिचर घेऊन येत आहे. जर का तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण असे काही फिचर घेऊन व्हॉट्सअॅप येत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला खूप सारे फायदे होणार आहेत.

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचर्सचे ट्रायल करणा-या WABetaInfo.com या वेबसाईटच्या मते, व्हॉट्सअॅप ग्रुपमधील इतर सदस्य ग्रुपचे नाव, आयकॉन किंवा डिस्क्रिप्शन बदलू शकणार की नाही? ते कोण बदलणार याचे अधिकार अॅडमिन देणार आहे.

गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून कंपनीने २.१७.३८७ हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे. ग्रुप मॅनेजमेंटमध्येही व्हॉट्सअॅपने खूप सुधारणा केल्यामुळे ग्रुप बनवणाऱ्याला इतर कुठलाही ग्रुप अॅडमिन ग्रुपमधून काढू शकत नाही. म्हणजेच ग्रुप क्रिएट करणाराच ग्रुपमधून एक्झिट करु शकतो. इतर दुसरा व्यक्ती डिलीट करु शकत नाही. सध्या ही प्रोसेस अपडेट ट्रायलमध्ये असून ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी अपडेट इनेबल करेल.

Leave a Comment