मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोनने लाँच केला स्वस्तातला स्मार्टफोन


मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एकत्र येत आपला स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून या स्मार्टफोनचे नाव भारत २ अल्ट्रा ४जी असे नाव असून ९९९ रुपये ऐवढी त्याची किंमत असेल असेही सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी बीएसएनएल, आयडिया आणि एअरटेलनेही आपले फिचर फोन लाँच करत असल्याची घोषणा केली होती. मायक्रोमॅक्सचा हा फोन ग्राहकांसाठी नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. पण प्रत्यक्षात या फोनची किंमत २८९९ ऐवढी असेल पण १९०० रुपये ग्राहकांना कॅशबॅक मिळणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

व्होडाफोनचे १५० रुपयांचे रिचार्ज मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनच्या युजरला ३६ महिन्यासाठी करावे लागणार आहे. ग्राहकांना त्यानंतरच १९०० रुपये परत मिळू शकणार आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या व्होडाफोन एम-वॉलेटमध्ये १८ महिन्यांनंतर ९०० रुपये जमा होतील तर त्यानंतर आणखी १८ महिन्यांनी पुढील १००० रुपये जमा होतील. मात्र त्यासाठी १५० रुपयांचे रिचार्ज करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment