लसणांची सालेही आहेत उपयुक्त


ब्रिटीश राजघराण्यातील स्वयंपाकात लसूण निषिद्ध मानला गेला असला तरी लसणाचे अनेक फायदे आहेत हे आपण जाणतो. आरोग्यासाठी लसूण अत्यंत उपयुकत आहे. लसूण सोलल्यानंतर बहुतेक सर्वच ठिकाणी त्याची साले फेकून दिली जातात. मात्र ही सालेही अतिशय उपयोगी आहेत. त्याचा कसा वापर करायचा यासंबंधीच्या कांही टिप्स

लसणांच्या सालात अँटी बॅक्टीरियल, अँटी व्हायरल व अँटी फंगल गुण आहेत. तसेच त्यात असलेले एलिसिन हे द्रव्य आरेाग्यासाठी लाभदायी आहे. ही साले बारीक चुरडून वापरली तर त्वचेसाठी अनेक फायदे मिळतात. ही साले कुटून अथवा बारीक कुसकरून पाण्यात उकळून हर प्रकारे वापरता येतात. अर्थात लसूण सोलल्याबरोबर ही साले वापरली तर त्याचा जास्त फायदा असतो.

लसणाची साले पाण्यात उकळावीत व हे पाणी कोमट असताना त्याने केस धुतले तर केस गळण्याची समस्या कमी होते. आपण सूप, चिकन स्टॉक करतो त्यावेळी सालेही त्यातच उकळली तर सूप किंवा स्टॉकची टेस्ट अनेक पटींनी वाढते.


यात अँटी बॅक्टीरियल गुणधर्म असल्याने साले वाटून चेहर्‍यावरील मुरूमांवर लावली तर मुरमे कमी होतात. साले पाण्यात उकळून ते पाणी गरम असतानाच प्यायले तर सर्दी पडसे कमी होते. ही साले घातलेले पाणी उकळून त्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवले तर पायावरची सूज कमी होते.

साले वाटावीत व मधात मिसळून सकाळ संध्याकाळ ते मिश्रण घेतले तर अस्थमाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. सालांची पेस्ट बनवून त्यात लिंबाचा रस घालून केसांच्या मुळाशी लावल्यास डोक्यातील उवा जातात. ही साले पॅनमध्ये गरम करून त्याची पावडर बनवावी व ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलात मिक्स करून केसांना लावल्यास केस काळे होतात.

लसणाची साले उकळलेले पाणी गार करून झाडांना घातले तर झाडांची वाढ झपाट्याने होते.

Leave a Comment