‘दिवाळी‘चे छायाचित्र वास्तविक दिवाळीच्या वीस दिवसांपूर्वीचे


एकोणीस ऑक्टोबर रोजी एका युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीराने अवकाशातून टिपलेले छायाचित्र ट्विटर वरून प्रसिद्ध केले. या छायाचित्रामध्ये असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने झगमगणारा भारत देश दिसतो आहे. पाओलो नेस्पोली या अंतराळवीराने दिवाळीच्या दिवशी हे छायाचित्र ट्विटरच्या माध्यामातून प्रसिद्ध केले असले, तरी हे छायाचित्र मात्र दिवाळीच्या सुमारे वीस दिवस आधीच टिपलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे छायाचित्र नेस्पोली याने दिवाळीच्या वीस दिवस आधी, म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी घेतलेले असून, नेस्पोलीच्या फ्लिकर अकाऊंटवर आधीच प्रसिद्ध झालेले आहे. त्याने दिवाळी निमित्त ट्वीट केलेल्या या छायाचित्राला साडेचार हजार री-ट्वीट असून, साडेसात हजार ‘ लाईक ‘ आले आहेत. नेस्पोली ने प्रसिद्ध केलेले हे छायाचित्र दिवाळीच्या दिवशीच टिपलेले आहे असा बहुतेक जणांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लाखो दिव्यांनी उजळलेला भारत देश बघतना अनेकांनी नेस्पोलीला धन्यावादपर संदेशही पाठविले होते. पण फ्लिकर वरील आपल्या अकाऊंटवर नेस्पोली याने हे छायाचित्र प्रसिद्ध केले, तेव्हा ते छायचित्र टिपले होते त्या दिवशीची तारीख ही छायाचित्राबरोबर प्रसिद्ध झाली असल्याने तारखेच्या गोंधळाबाबत उलगडा झाला आहे.

Leave a Comment