मजेदार कायदे असलेले देश


जगभरात एकही देश असा नसेल ज्याचे स्वतःचे कांही नियम, कायदे आहेत. कायदे व नियम हे देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकही आहेत. मात्र काही देशांतील कायदे इतके विचित्र असतात की ऐकूनही माणसाची करमणूक होऊ शकते. कधी कधी तर असे कायदे करण्यामागचे प्रयोजनही आपल्याला कळत नाही. असेच कांही मजेदार कायदे माझा पेपरच्या वाचकांसाठी


दुबईमध्ये अनेक कडक कायदे आहेत. मात्र येथे रस्त्यावर कार आणताना तिची नंबर प्लेट घाणेरडी असेल तर पोलिस दंड वसूल करतात. रशियात तर न पुसलेली कार रस्त्यावर आणणे हा गुन्हा असून त्यासाठी दंडाची तरतूद आहे. दुबईतच सार्वजनिक बीचवर चुंबन घेणे गुन्हा आहे.


कॅनडातील अल्बटी येथे बाजारात शपथ घेणे, मारामार्‍या करणे अथवा ओरडण्यावर बंदी आहे. असे करताना जर कुणी पकडला गेला तर त्याला ५ हजार रूपये दंड केला जातो. बोलिवियाच्या ला पाज राज्यात विवाहित महिलेला १ ग्लासपेक्षा अधिक वाईन कायद्याने पिता येत नाही.


इटलीच्या काप्री बेटावर आवाज करणारे चप्पल, सँडल्स वापरण्यावर बंदी आहे. अर्थात ही बंदी फक्त महिलांसाठी आहे. अमेरिकेच्या स्टेट ओक्लाहामामध्ये कुत्र्यासमोर वेडेवाकडे चेहरे करून दाखविणे हा अपराध मानला जातो. ब्रिटनमध्ये गर्भवती महिलांना कुठेही मुत्रविसर्जन करण्याची परवानगी आहे.


इटलीतच इराक्लीअ शहरात बीचवर वाळूची घरे बांधणे हा अपराध मानला जातो. इटलीच्याच स्टेट एबोलीत कारमध्ये चुंबन घेणे हा अपराध आहे.


अमेरिकेच्या स्टेट अर्कन्सान मध्ये महिन्यातून एकदा पतीला पत्त्नीला मारहाण करण्याची परवानगी आहे. फ्लेारिडामध्ये रविवारी कुमारी मुलींना स्कायडायव्हींग करण्याची परवानगी नाही. हा नियम मोडला तर तो गुन्हा मानला जातो.

Leave a Comment