असल्या टॉफीज पाहिल्यात कधी?


दिवाळी नुकतीच संपते आहे. आजकाल आपल्याकडेही सणासुदीची भेट म्हणून चॉकलेट देण्याची प्रथा रूजू लागली आहे. जगात बहुतेक सर्व देशात सणउत्सवात चॉकलेट, टॉफीज देण्याची प्रथा आहे. आपल्या नजरेसमोर टॉफी म्हटले की मस्त विविध रंगातील, छान स्वाद असलेल्या गोड टॉफीच प्रथम येतात. मात्र जगभरात अनेक प्रकारच्या टॉफीज विकल्या जातात व त्यातील कांही तर भयंकर विचित्र म्हणाव्या अशा आहेत.
असल्या टॉफींची चव घेणे तर सोडाच पण त्यांच्याबद्दल आपण कधी ऐकलेलेही नसते.

होटिलिक्स नावाची कंपनी लॉलीपॉप प्रमाणे दिसणार्‍या टॉफी विकते. या प्रत्येक टॉफीमध्ये विंचू, अनेक प्रकारचे किडे अथवा ढेकूण असतात.. बाहेरून नॉर्मल वाटणारी ही टॉफी चवीला कशी असते कुणास ठाऊक. हीच कंपनी कांदा, चीजच्या स्वादाची चॉकलेटही बनविते.


जेली बिन कँडी नावाची कंपनी गेली १५० वर्षे टॉफीज बनविते आहे. या टॉफी विविध स्वादाच्या असतात. म्हणजे कानातला मळ, साबण, माती, बिअर, सॉक्सचा वास असलेल्या टॉफी ही कंपनी बनविते. या गोळ्या बाहेरून दिसायला एकदम नॉर्मल व आकर्षक दिसतात पण खाल्यानंतर त्यांचा स्वाद कसा असेल हे सांगता येत नाही.


अमेरिकेत बाहेरून टॉयलेट सारखी दिसणारी टॉफी विकली जाते. याचा फ्लेवर वेगळा असला तरी टेस्ट नॉर्मल असते. ही एक प्रकारची पावडर आहे त्यात पाणी मिक्स करून ती प्यायची असते.


जपानमध्ये मिळणार्‍या टॉफी पॅकेटवर ती कशी बनवायची याच्या सूचना दिलेल्या असतात. त्यानुसार ती आपणच बनवायची असते.


हिर्यांसारख्या दिसणार्‍या या टॉफीची किंमत ऐकूनच ती खाण्याचे डेरिंग होणार नाही. या एका टॉफीची किंमत आहे २२०० रूपये.


ही टॉफी चक्क २८ इंच लांबीची आहे आणि ती दिसते सापाप्रमाणे.


एक अमेरिकन कंपनी आले, मश्रूम, मीठ, विविध मसाल्याच्या स्वादाच्या टॉफी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर कॅडी वेअर कंपनी युरीनचे सँपल ज्या बाटल्यातून गोळा करतात तसल्या बाटलीतून लिकिवड टॉफी विकते.

Leave a Comment