राजघराणे सोडून कृष्ठरोग्यांची सेवा


नवी दिल्ली- नेपाळचे राजघराणे सोडून कविता भट्टाराई कृष्ठरोग्यांची सेवा करीत आहेत. कविता भट्टाराई या चंपारणजवळील नेपाळच्या सीमेजवळ सामान्य जीवन जगत आहेत.

54 वर्षीय कविता यांनी चंपारण परिसरात कुष्ठरोगी रूग्णांसाठी एक वस्ती बसविली आहे. या ठिकाणी त्यांना उपचार, रोजगार आणि शिक्षण यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या कुष्ठरोगाच्या मुक्तीसाठी लढा देत आहे.

कविता यांचे बालपण नेपाळच्या विराटनगर येथे गेले. त्यांनी अमेरिकेच्या हावर्ड यूनिवर्सिटीतून मास्टर ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. 1990 मध्ये नेपाळचे पहिले पंतप्रधान कृष्ण प्रसाद भट्टाराई यांच्या सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

त्यानंतर त्यांनी आपले राजघराणे सोडले. त्या सर्वसामान्यांच्या सेवत सामील झाल्या. कॅनडा येथील एका स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेला सुरवात केली. 17 वर्ष त्या नेपाळ येथील गरीब महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यानंतर त्यांनी आपले जीवन कृष्ठरोगींच्या सेवत समर्पीत केले आहे.

Leave a Comment