लांब पल्ल्याचा रेल्वेप्रवास होणार आणखी सुखद


नवी दिल्ली – लवकरच लांब पल्ल्याच्या ५०० पेक्षा जास्त गाड्यांच्या वेळेत भारतीय रेल्वे सुधारणा करुन येण्या-जाण्याच्या नियोजित वेळेपेक्षा २ तासांचा अवधी कमी करणार आहे.

याबाबत माहिती देताना रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नोव्हेंबरमध्ये रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या नव्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात येणार आहे. रेल्वेने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या निर्देशानंतर नवीन वेळापत्रक तयार केले आहे. प्रवाशांमध्ये यामुळे लोकप्रिय असलेल्या गाड्यांचा प्रवासाचा कालावधी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनीट ते २ तासांपर्यंत कमी करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात प्रत्येक विभागाला वेळेचे नियोजन करण्यासाठी दोन ते चार तासांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यांनी म्हटले, सध्या उपलब्ध असलेल्या रॉलिंग स्टॉकचा जास्तीत जास्त वापर करण्याची आमची योजना आहे. दोन पद्धतीने याचा वापर करणार आहोत. एक म्हणजे एखादी रेल्वे वापस जाण्यासाठी यार्डात वाट पाहत थांबली असेल तर तिचा वापर थांबवण्यापेक्षा त्या वेळेत दुसऱ्या ट्रॅकवर करणार आहोत.

त्याचबरोबर ५० अशा रेल्वे यार्डात वाट पाहत थांबण्यापेक्षा मार्गावर नव्या वेळापत्रकामुळे धावणार आहेत. सध्या एकुण ५१ लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या येण्या-जाण्याच्या वेळेत यामुळे १ ते ३ तासांचा अवधी कमी होणार असून भविष्यात ५०० पेक्षा जास्त रेल्वेच्या वेळेत हा बदल होणार आहे. खात्यांतर्गत ऑडिट रेल्वेने सुरू केले असून यामध्ये ५० मेल आणि एक्सप्रेस गाड्या यापुढे सुपरफास्ट रेल्वे म्हणून धावणार आहेत.

सध्या उपलब्ध असणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यात येणार आहे. भोपाल-जोधपूर एक्सप्रेससारख्या रेल्वे ९५ मिनिटे अगोदर पोहोचणार आहे. तसेच गुवाहाटी-इंदूर स्पेशल आपली २३३० किलोमीटरचा प्रवास ११५ मिनिटे अगोदर पूर्ण करणार आहे. एकूण १९२९ किलोमीटरचा प्रवास करणारी गाजीपुर-बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ९५ मिनिटे पहिले आपला प्रवास पूर्ण करणार आहे. रेल्वेने स्थानकावर थांबवण्याच्या वेळा कमी केल्या आहेत. यामुळे कमी आवक-जावक असणाऱ्या स्थानकावर या रेल्वे थांबणार नाहीत. लाईन आणि आधारभूत संरचनेसाठी चांगली असणारी, स्वयंचालित यंत्रणा, १३० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणाऱ्या नव्या लिंके-हॉफमेन बुश कोचमुळे रेल्वे निश्चित स्थानकावर वेगाने पोहोचणार आहे.

Leave a Comment