गुगलची चूक शोधा आणि पैसे कमवा


मुंबई : ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये ‘अॅपल अॅप स्टोअर’च्या तुलनेत अधिक मालवेअर आणि कमतरता असल्याचे काही सुरक्षा तज्ज्ञांच्या म्हणणे आहे. गूगलने याच चुका सुधारण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. कमीत कमी १००० यूएस डॉलर म्हणजेच जवळपास ६५ हजार रुपयांचे बक्षीसच गूगलने ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि ‘अॅन्ड्रॉईड अॅप’मधल्या चुका शोधून काढणाऱ्याला जाहीर केले आहे.

गूगल प्ले स्टोअरमधून सगळे ‘बग्ज’ हटवण्याच्या मोहिमेवर गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट आहे. गूगलने हॅकरवन नावाच्या कंपनीशी यासाठी हातमिळवणीही केली आहे. अॅन्ड्रॉईड अॅपमधील सगळ्या कमतरता ही कंपनी शोधून काढणार आहे. हॅकर्सला कोणत्याही युझरला या मालवेअर आणि कमतरतांमुळे फिशिंग वेबसाईटकडे धाडणे सोपे होते. यामुळे वायरसचा धोका वाढतो.

उल्लेखनीय म्हणजे दुसऱ्या कंपन्यांनी तयार केलेल्या ‘गूगल प्ले सिक्युरिटी रिवॉर्ड प्रोग्राम’ सॉफ्टवेअरमध्ये रिसर्चला स्पॉन्सर करतो. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कमतरता शोधून काढणाऱ्याला मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अल्फाबेट या कंपन्या अनेकदा बक्षीसे देताना दिसतात. गूगलने आत्तापर्यंत जवळपास १५ लाख डॉलर्सची बक्षीसे दिली आहेत.

Leave a Comment