झेडटीईचा डबल स्क्रीनचा अॅक्सॉन एम स्मार्टफोन


सॅमसंग, अॅपल सारख्या बड्या कंपन्या फोडेल्बल डबल स्क्रीनचे स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी कामाला लागल्या असताना चीनी कंपनी झेडटीई ने त्यांचा पहिला डयुल डिस्प्लेचा स्मार्टफोन अॅक्सॉन एम नावाने अमेरिकेत लाँच केला गेला आहे. हा फोन लवकरच युरोप, चीन व जपानच्या बाजारातही सादर केला जात असून या फोनला छोट्या बिजागिरीच्या सहाय्याने जोडलेले स्क्रीन आहे. फोन फोल्ड केल्यानंतर तो सहज खिशात मावू शकतो.

या फोनसाठी चार मोड दिले गेले असून त्यातील एका मोडवर वेगवेगळ्या स्क्रीनवर दोन वेगळी अॅप एकाचवेळी ऑपरेट करता येतात. फोनचा पूर्ण स्क्रीन ६.७५ इंची असून तो गेम्ससाठी अत्यंत चांगला आहे. या फोनला ५.२ इंच ड्युल फुल एचडी टीएफटी एलसीडी डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, अँड्राईड ७.१.२ नगेट ओएस, क्विकचार्ज तंत्रज्ञानासाह ३१८० एमएएच ची बॅटरी अशी फिचर्स आहेत. फोनसाठी एकच २० एमपीचा कॅमेरा आहे मात्र तो रियर व फ्रंट फोटोसाठी वापरता येतो.

Leave a Comment