फ्ल्यू होऊ नये म्हणून


सध्या हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हवेत गारवा निर्माण व्हायला लागला की, आपण घराबाहेर पडणे टाळतो आणि स्वत:ला घरात जवळ जवळ कोंडूनच घेतो. अशा वेळी घराच्या कोंदट हवेत अपल्याला काही आजार होण्याची शक्यता असते. त्यातल्या फ्ल्यूसारख्या व्हायरसमुळे होणार्‍या आजारापासून संरक्षण करण्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे. सर्वात मोठी पूर्वकाळजी म्हणजे लस टोचून घेणे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेेन्शन या संस्थेने फ्ल्यू प्रतिबंधक लस तयारही केलेली आहे. पण ती दरसाल एकदा टोचून घ्यावी लागते. तसा विचार केला तर फ्ल्यूचा प्रादुर्भाव होणारे अनेक व्हायरस आहेत पण त्यातल्या प्रमुख विषाणूंचा बंदोबस्त या लसीने होत असतो. या लसीने फ्ल्यूचा धोका १०० टक्के टळत नाही पण बराच टळतो.

या संस्थेने सहा महिने वयाच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना या लसीची शिफारस केली आहे आणि शक्यतो ती दरसाल ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी टोचून घ्यावी असे सुचविले आहे. सहा महिन्यांच्या आतील बाळांना ही लस टोचू नये असे म्हटलेले आहे. पण अशा बाळांना फ्ल्यूचा मोठा धोका आहे असे वातावरणातून जाणवत असेल तर त्याच्याऐवजी त्याची काळजी घेणारांना म्हणजे प्रामुख्याने त्याच्या आईला ही लस टोचावी. त्या बाळाला त्याची आजी, किंवा मोठी बहीण असे कोणी वारंवार घेत असतील तर त्यांनाही ही लस टोचावी. फ्ल्यू हा आजार रोग प्रतिबंधक शक्ती कमी असणारांना होण्याची शक्यता जास्त असतेच पण हा आजार संसर्गजन्यही आहे त्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते.

आरोग्यदायी सवयी हा या आजाराचा प्रतिबंध करण्याचा मोठा प्रभावी उपाय आहे. नाक आणि तोेंड सतत झाकलेले ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आजार झााला असेल तर त्याचा प्रसार रोखला जातो आणि आपल्याला तो झाला नसेल तर तोंड तसेच नाकातून म्हणजे श्‍वास घेण्याच्या मार्गाने तो आपल्याला होण्याचा धोकाही कमी होतो. खोकताना सावध असले पाहिजे आणि त्या वेळी तोेेंडावर हात झाकला पाहिजे. नाकाला आणि तोेंडाला सतत हात लावू नये. तसे करण्यानेे हाताला हे विषाणू लागतात आणि तोच हात दुसर्‍या कोणाच्या स्पर्शासाठी वापरले तर त्या स्पर्शातून या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. कोणत्याही क्षणी आपल्या हाताला या विषाणूंचा स्पर्श होण्याची शक्यत असते. म्हणून अधुन मधुन हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment