देशातील शंभर पुरातन वास्तू होणार स्मार्ट


नवी दिल्ली – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशातील शंभर स्मारकांना आदर्श स्मारक करण्याची योजना केली आहे. या स्मारकांमध्ये पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कंबर कसली आहे.

लाइट एंड साउंड शो, संवादमाध्यम केंद्र, कैफेटेरिया, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, पुस्तकालय, ऑडियो विजुअल सेंटर, वाय-फाय सुविधा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून या स्मारकांच्या उत्पादनातही नक्कीच भर पडणार आहे.

अपंगांसाठी विशेष सुविधा येथे असतील. पर्यटकांना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, अशा त्यांच्यासाठी अनुकूल सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील 3686 स्मारकांची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे.

Leave a Comment