कारमध्ये स्मार्टफोन चार्ज करताना ही घ्या काळजी


आज काल स्मार्टफोन अनेक गोष्टींसाठी वापरला जातो व त्यामुळेच हे फोन वारंवार चार्ज करावे लागतात. कांही वेळा प्रवासात फोन चार्ज करण्याचीही वेळ येते. अनेक कार्समधून स्मार्टफोन चार्जिगसाठी पॉईंट दिलेले आहेत. कार चालवित असताना फोन चार्ज करण्याची वेळ आली तर कांही गोष्टी आवर्जून टाळायल्या हव्यात. अन्यथा फोन चार्ज होण्यास अधिक वेळ लागतोच पण बॅटरीचे नुकसानही होऊ शकते. तसेच बॅटरीचे लाईफ कमी होण्याची शक्यता वाढते.

कारमध्ये फोन चार्ज करताना फोनचा वापर सुरू असेल तर चार्जिंग शक्यतो टाळावे. कारण यामुळे फोन चार्ज होण्यास अधिक वेळ लागतो. तसेच फोन चार्जिंग सुरू असताना जीपीएस, ब्ल्यू टूथ अशी फिचर्स काम करत असतील तर फोन चार्ज होण्यासाठी जितकी पॉवर मिळत असते त्यापेक्षा अधिक खर्च होत असते..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा खूपच गरज असेल तेव्हाच कारमध्ये फोन चार्जिंग करावे. फोनची बॅटरी थोडीशीच कमी झाली असेल तर लगेच चार्जिग नकोच. कारण यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते तसेच बॅटरीचे लाईफ कमी होते. फोन चार्ज झाला किंवा होत आला की लगेच चार्जिंग बंद करावे तसेच फोनसाठी वापरला जाणारा चार्जर योग्य हवा. कार अथवा घर कुठेही चार्जिंग करताना ही दक्षता नक्कीच घ्यावी.

फोन कमी वेळात चार्ज करायचा असेल तर तो स्विचऑफ करून चार्ज केला तर कमी वेळात चार्ज होतो.

Leave a Comment