जिओने ऐन दिवाळीत सर्व प्लॅनमध्ये बदल करून गुरूवारपासून ते तत्काळ प्रभावाने लागू केल्याने जिओ युजर्सना ऐन दिवाळीत दणका बसला आहे. जिओने केलेली ही दरवाढ युजरसाठी निराशेची ठरली आहे. जिओने त्यांचा ३९९ रूपयांचा ८४ दिवसांचा प्लॅन आता युजरना ४५९ रूपयांत देऊ केला आहे म्हणजे या प्लॅनमध्ये ६० रूपये दरवाढ केली आहे. या प्लॅनमध्ये युजरला रोज १ जीबी डेटा मिळत होता.
युजरना जिओ कडून दिवाळीत दरवाढीची भेट
अर्थात जिओने ३९९ चा प्लॅन अजूनही सुरू ठेवला आहे मात्र त्यात ७० दिवसांसाठी ७० जीबी डेटा मिळू शकणार आहे. १४९ रूपयांच्या प्लॅन घेतलेल्या युजरना थोडा फायदा झाला आहे. त्यात २८ दिवस फोर जी स्पीडने मिळणारा २ जीबी डेटा आता ४ जीबी मिळणार आहे. तसेच छोट्या व शॉर्ट टर्मसाठीच्या प्लॅनचे दर कमी केले गेले आहेत. मात्र ९९९ रूपयांत९० दिवसांसाठी दिला जाणारा ९० जीबी डेटा आता ६० दिवस व ६० जीबी वर आणला गेला आहे.