जगातील एकूण सोन्याच्या ११ टक्के सोने भारतीय महिलांकडे


दिवाळी हा धनऐश्वर्याचा सण. आज लक्ष्मीपूजन. घरोघरी तसेच व्यापार्‍यांच्या दुकानातून आज लक्ष्मीची पूजा केली जाईल. लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही तर सोने, चांदी असे मौल्यवान धातूही या वेळी पुजले जातात. नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जगात जेवढे सोने आहे त्यातील ११ ट्क्के इतके सोने भारतीय महिलांकडे आहे. हे प्रमाण ब्रिटन व सौदीतील सोन्यापेक्षाही अधिक आहे.

भारतात सोने शुभ मानले जाते व त्यामुळे प्रत्येक जण जमेल तेव्हा थोडेथोडे सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतो. सोने पुजेसाठीही वापरले जाते व त्यामुळे भारतातील मंदिरांतूनही सोन्याचा वापर केला जातो. भाविक देवाला सोन्याचांदीच्या वस्तू अर्पण करण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. यामुळेच भारतीय घरांतून व मंदिरातून २२ हजार टन सोने जमा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यातील १८ हजार टन सोने भारतीय घरातून आहे. या सोन्याची जागतिक बाजारातील किंमत आहे ९५० अब्ज डॉलर्स म्हणजे ६१ लाख ८० हजार कोटी रूपये.

Leave a Comment