नारीपुराण


ईश्वराची सर्वात अद्भूत निर्मिती म्हणजे स्त्री असे म्हटले जाते.पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक देशाच्या संस्कृतीत महिलांचे विशेष स्थान आहे. भारतीय वेदांत तर महिलांना विशेष दर्जाही होता. महिलांसंदर्भात कांहीही ऐकण्याची उत्सुकता केवळ पुरूषांनाच नसते तर महिलाही त्यांच्याबद्दल तसेच अन्य महिलांबद्दल कांहीही ऐकण्यास नेहमीच उत्सुक असतात. अशा या सर्वजगव्यापी महिलांसंदर्भातील कांही रेाचक माहिती येथे देत आहोत.


बोलण्यात महिलांचा हात कुणीच धरू शकणार नाही हे जागतिक सत्य आहे. एका संशोधनात असे आढळले की दिवसाकाठी महिला किमान २० हजार शब्द बोलतात तर पुरूष १३ हजार शब्द बोलतात. तसेच आपण आज काय घालावे याचा विचार करण्यात महिलांचा बराच वेळ खर्ची पडत असतो. हा वेळ साधारण त्यांच्या आयुष्यातील १ वर्ष इतका असतो. तसेच जगातील टॉप २० श्रीमंत महिला त्यांच्या पतीच्या
अथवा वडिलांच्या संपत्तीच्या वारसदार बनून श्रीमंत झालेल्या आहेत.


महिला जितक्या बोलण्यात पटाईत तितक्याच रडण्यातही. एका अभ्यासानुसार महिला वर्षातून साधारणपणे किमान ३० ते ६४ वेळा रडतात तर पुरूष ६ ते १७ वेळा रडतात. खोटे बोलण्यात मात्र पुरूष आघाडीवर असतात व ते महिलांच्या तुलनेत दुप्पट खोटे बोलतात. ब्रेकअप झाल्याच्या वेदना महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक होतात. तसेच हार्टअॅटॅकमध्ये महिलांना खांद्यात वेदना होतात तर पुरूषांना छातीत.


दर ९० सेकंदाला १ गर्भवती महिला मृत्युमुखी पडते. रशियात पुरूषांच्या तुलनेत ९० लाख महिला अधिक आहेत. भारतात सर्वात कमी वयात घटस्फोट मिळालेल्या मुलीचे वय १० वर्षे आहे. महिलांचे हृदय पुरूषांच्या तुलनेत अधिक वेगाने धडकते. एका मिनिटात महिला १९ वेळा पापण्या मिटतात तर पुरूष ११ वेळा. गर्भावस्थेत ज्या महिला अधिक घोरतात त्यांची बाळे लहान निपजतात. अमेरिकेत ४० टक्के मुले अविवाहित महिलांच्या पोटी जन्माला येतात.


महिलांना पुरूषांच्या तुलनेत वाईट स्वप्ने अधिक पडतात. ८० टकके महिला चुकीच्या नंबरची ब्रा वापरतात. दिवसातून किमान ९ वेळा महिला आपल्या लूक्सबद्दल विचार करतात. तसेच एकाच वेळी अनेक कामे करण्यात महिलाच आघाडीवर असतात. त्या पुरूषांच्या तुलनेत जगतातही जास्ती. अमेरिकेत ३० टक्के बिझिनेसच्या मालक महिला आहेत.


महिलांच्या बुद्धीबद्दल नेहमीच शंका घेतली जाते. मात्र संगणकासाठी पहिला प्रोग्रॅम लिहिणारी महिलाच होती. सेंट लुसिया या नावाचा पृथ्वीच्या पाठीवरचा एकमेव देश महिलेच्या नावावरून आहे. महिलांना चपला बूट खरेदीची अतोनात हौस असते. मात्र खरेदी केलेल्या जोड्यांपैकी ४० टक्केच जोडे त्या प्रत्यक्षात वापरतात.

Leave a Comment