व्हॉट्सअॅपचे नवे फीचर दाखवणार तुमचे रिअल लोकेशन


मुंबई- दिवाळीच्या शुभमुहूर्तावर व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आपले नवे फीचर आणले आहे. आता युजर्स त्याचे लाईव्ह लोकेशन या नव्या फीचरमध्ये शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपवर याआधीही लोकेशन शेअर करता येत होते पण त्यातून लाईव्ह अपडेट्स मिळत नव्हते. तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमध्ये शेअर करू शकणार आहात. या लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून एकदा लोकेशन शेअर केल्यावर त्याचे लाईव्ह अपडेट्स लोकेशन ज्या व्यक्तीबरोबर शेअर केले त्याला मिळतील.

तुमचे लोकेशन कॉन्टॅक्ट लिस्टमधील एखाद्या व्यक्तीबरोबर शेअर केल्यावर नेहमी ते तुमच्या लोकेशनची माहिती देणार नसून लाईव्ह लोकेशन हे फिचर काही वेळासाठी काम करेल. तुम्हाला जर पुन्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या लोकेशनबद्दल माहिती द्यायची असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा लाईव्ह लोकेशन शेअर करावे लागणार आहे. तुमच्या व्हॉट्सअॅपवरील कुठल्याही ग्रुप किंवा पर्सनल चॅटवर तुम्ही लोकेशन शेअर करू शकता.

तुमचे लाईव्ह लोकेशनचे अपडेट्स लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून मिळतील. जर तुमचा कोणाला भेटायचा बेत असेल, तुम्ही कुठे आहात? प्रवासाला कधी सुरूवात करणार आहात? सुरक्षित ठिकाणी आहात की नाही? याबद्दलची माहिती देण्यासाठी या लाईव्ह लोकेशनचा फायदा होणार आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅपचे प्रोडक्ट मॅनेजर झफीर खान यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

Leave a Comment