विनाकार्ड एटीएम मधून पैसे काढा


वॉशिंगटन – एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड न वापरता पैसे निघाले तर… होय या प्रकारच्या एटीएमचा वापर अमेरिकेत सुरू झाला आहे. स्मार्ट फोनच्या मदतीने विनाकार्ड एटीएममधून पैसे काढता येणे शक्य आहे.

अमेरिकेत पाच हजार एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऐपल पे चा वापर कऱणारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापराविना या एटीएममधून व्यवहार करीत आहेत. ही सुविधा वेल्स फारगो एटीएममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपण जर घरी आपले एटीएमकार्ड विसरला असाल तर या सुविधेमुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी एपलचा स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. याचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा एपल पे चा उपयोग करावा लागतो. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये वॉलेट फीचरला एक्टिव करावे लागते.

यानंतर नियर-फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्राचा वापर करून एटीएममध्ये पैसे काढणे किंवा पैसे भरणे आदी व्यवहार करता येतात. एनएफसी तंत्रज्ञानाची एक चीप या एटीएममध्ये असते. यामाध्यमातून विना कार्ड व्यवहार करणे शक्य होते. भारत व अन्य देशात ही सुविधा लवकरच येणार आहे.

Leave a Comment