बग शोधा, १ कोटींपेक्षा अधिक बक्षीस मिळवा- मायक्रोसॉफ्टची ऑफर


मायक्रोसॉफटने त्यांच्या युजरसाठी आकर्षक ऑफर दिली असून कांही मिनिटांत करोडपती बनण्याची संधी देऊ केली आहे. यासाठी युजरला विंडोज १० मधील मायक्रोसॅफ्ट व्हर्च्युअलायझेशन सॉफटवेअर मध्ये बग असल्यास तो शोधून त्याची माहिती कंपनीला द्यायची आहे. विंडोज १० अधिक सुरक्षित व बगमुक्त बनविण्यासाठी कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या योजनेत ५०० डॉलर्सपासून ते २५ हजार डॉलर्सपर्यंत बक्षीस मिळविण्याची संधी मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टने २०१२ सालापासून अशा ऑफर्स देण्याची सुरवात केली होती. त्याचा विस्तार आता विंडोज १० पर्यंत केला गेला आहे. असा एखादा बग जो कंपनी डिझाईन, विशेषाधिकारांना नुकसान पोहोचवू शकेल अथवा युजरच्या प्रायव्हसी व सुरक्षेला संकटात टाकू शकेल त्याची माहिती बग शोधणार्‍याने कंपनीला द्यायची आहे असे कंपनीच्या वेबसाईटवर स्पष्ट केले गेले आहे. गुगल, फेसबुक, अॅपल या कंपन्याही अशा प्रकारे बग शोधून देणार्‍यांना चांगल्या रकमांची बक्षीसे देत असतात.

Leave a Comment