एसी हॉटेलमध्ये जेवणे होणार स्वस्त


नवी दिल्ली – आता एसी हॉटेलमध्ये जेवण जेवल्यानंतर तुम्हाला कमी कर द्यावा लागेल. जीएसटी परिषद एसी हॉटेलमध्ये लावला जाणारा जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणणार आहे. त्यामुळे आता हॉटेलमध्ये जेवणा-यांच्या बिलात ६ टक्क्यांची कपात होणार आहे आणि नॉन-एसी आणि एसी हॉटेलमधील तफावत कमी होणार आहे.

रविवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील मंजुरी देण्यात आली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, देशातील एसी हॉटेलमध्ये आकारला जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवरून आणण्याच्या बाजूने आहेत. लवकरच याबाबत एक बैठक होणार आहे. पंचतारांकित त्यापेक्षा महाग श्रेणीतील हॉटेलमध्ये १८ टक्के जीएसटी कायम रहाण्याची शक्यता आहे. यावर अंतिम निर्णय नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात येईल.

नोव्हेंबरनंतर एसी हॉटेल मालकांना इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ मिळणार नाही. या क्रेडीटच्या नावावर हॉटेल मालकांनी लुटमार चालवली होती. अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याच्या म्हणण्यानुसार या क्रेडिटचा फाद्य ग्राहकांना होतच नव्हता.

Leave a Comment