एसयूव्हीच पण रणगाड्यासारखी दणकट


प्रथमदर्शनी स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल सारखीच फिचर्स असणारी रिझवान मोटर्सची रिझवान टँक ही एसयूव्ही कुणालाही भुरळ पाडेल अशा स्वरूपात येत आहे. लग्झरी कारचा लूक असलेल्या या गाडीचे फिचर्स एखाद्या भक्कम रणगाड्याप्रमाणे आहेत. ही केवळ बुलेटप्रूफच नाही तर तिला नाईट व्हिजन सुविधाही दिली गेली आहे. ही गाडी प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित आहे. स्वतः एफ फोर फायटर जेट पायलट असलेल्या फेरिस रिझवान यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रिझवान मोटर्सतर्फे ही कार सादर केली गेली आहे.

या एसयूव्हीला ६.४ लिटरचे व्ही ८ इंजिन दिले गेले असून ही कस्टमाईज करू घेता येणारी एसयूव्ही आहे. ऑन डिमांड फोर बाय फोरसह थर्मल नाईट व्हिजन टेक व ऑप्शनल ब्लास्टिक आर्मर प्रोटेक्शन दिले जाणार आहे. या कारचा पुढचा दरवाजा पुढच्या बाजूने तर मागचा दरवाजा मागच्या बाजूने उघडतो. दरवाजे इलेक्ट्रीक पॉवर्ड आहेत. कारचा ग्राऊंड क्लिअरन्स उत्तम आहे. तसेच हेडअप डिस्प्ले, सिस्टीम स्पीड नेव्हीगेशन, इनकमिंग कॉल्स, टेक्स्ट मेसेज, फ्यूएल लेव्हल, कॅलेंडर नोटिफिकेशन, रस्त्यावरचे स्पीड लिमिट अशा अनेक सुविधा आहेत. ब्लास्टीक आर्म, बुलेट प्रूफ ग्लास, मिलिट्री ग्रेड रन फ्लॅट टायर्स अशाही सुविधा आहेत. या कारच्या किमती १ कोटी १५ लाखांपासून पुढे आहेत.