रेझरचा पहिला स्मार्टफोन १ नोव्हेंबरला भारतात


स्मार्टफोन उत्पादक कंपनी नेक्सबिटचे अधिग्रहण केल्यानंतर गेमिंग लॅपटॉप व संगणक संबंधीत उत्पादने तयार करणार्‍या रेझर कंपनीने त्यांचा पहिलावहिला स्मार्टफोन १ नोव्हेंबरला भारतीय बाजारात उतरविण्याचे ठरविले असल्याचे वृत्त अँड्राईड हेडलाईन्स ने दिले आहे. या संदर्भात जो फोटो कंपनीतर्फे सादर करण्यात आला आहे तो नेक्स्टबिटच्या रॉबिनप्रमाणेच दिसतो आहे. मात्र फोनच्या मागे रेझरचा लोगो आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे या फोनमध्ये गेमिंगसाठी विशेष फिचर्स असतील तसेच ही फिचर्स क्लाऊड आधारित असतील. या फोनला ५.७ इंची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम, १२ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल असेही सांगितले जात आहे.