दुबई पोलिसांकडे हवेत उडणारी बाईक


रस्त्यावरून तुफान वेगाने व गडगडाटी आवाज करत जाणार्‍या बाईक हे सर्रास दिसणारे दृष्य आहे. मात्र हवेत १६ फूट उंचावरून उडणारी बाईक आपण अद्यापी पाहिलेली नसेल. ही केवळ कल्पना नसून दुबई पोलिसांच्या ताफ्यात अशा बाईक सामील करण्यात आल्या आहेत. गल्ली बोळातून जेथे पोलिसांची वाहने जाऊ शकणार नाहीत त्याठिकाणी चोर बदमाशांना पकडता यावे यासाठी या बाईकचा वापर केला जाणार आहे. हॉवरबाईक असे या बाईकचे नांव असून रशियन हॉवरसर्फ कडून ती डिझाईन केली गेली आहे.

या बाईकला चाकाच्या जागी रोटर्स बसविले गेले आहेत.त्याच्या सहाय्याने ही बाईक उडू शकते. मानवरहित ड्रोनपेक्षा दुप्पट वजनाची ही बाईक १६ फुटांवरून ताशी ४३ मैल वेगाने २५ मिनिटांपर्यंत हवेत उडू शकते. त्यातील सेफ्टी मॅकॅनिझममुळे तिच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अथवा दुर्घटनेपासून बचाव करणे शक्य होते.

Leave a Comment