पहिले वॉटरप्रूफ किंडल सादर


अमेझॉनने त्याचे सर्वात प्रगत ईबुक रिडर किंडल ओएसिस लाँच केले आहे. कंपनीचे हे पहिले वॉटरप्रूफ किंडल असून हाय रेझोल्युशन पेपर व्हाईट डिस्ले त्याला दिला गेला आहे. या किंडलच्या ८ जीबी मॉडेलसाठी २१९९९ तर ३२ जीबी मॉडेलसाठी २८९९९ (वायफाय व थ्रीजी मोफत) अशा किंमती ठेवल्या गेल्या आहेत.

या किंडलची बॅटरी कित्येक आठवडे चालते व क्विक चार्ज तंत्रज्ञानामुळे दोन तासांत पूर्ण चार्ज होते. १० वर्षांपूर्वी कोणतेही पुस्तक ६० सेकंदात पोहोचविण्याच्या कल्पनेतून किंडल लाँच केले गेले होते असे सांगून कंपनीचे उपाध्यक्ष डेव लिम्प म्हणाले, ७ इंची स्क्रीनचे वॉटरप्रफ किंडल ओअॅसिस हे आमच्या उत्पादनातील सर्वात आधुनिक उत्पादन आहे. ते जाडीला पातळ व हलके आहे. प्रति पान ३० टक्के जादा शब्द यात दिसतील. त्याला मागच्या बाजूला अॅल्युमिनियम कव्हर दिले गेले आहे. कव्हर उघडले की किंडल सुरू होईल, बंद केले की आपोआप बंद होईल. अर्थात हे कव्हर हवे असेल त्याना त्यासाठी वेगळी रक्कम मोजावी लागणार आहे.

Leave a Comment